जुन्नर तालुक्यातील ७ रस्त्याच्या १०३ किलोमीटरच्या लांबीला प्रमुख जिल्हा मार्ग दजोन्नत्तीचा दर्जा:- आमदार अतुल बेनके

1 min read

जुन्नर दि.१५:- जुन्नर तालुक्यातील ७ इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांच्या १०३ किलोमीटर लांबीला प्रमुख जिल्हा मार्ग दजोन्नत्तीचा दर्जा दिल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

आमदार अतुल बेनके यांनी सांगितले की, रा.म.60 ते संतवाडी ते सुरकुलवाडी नळावणे ते अणे ते जिल्हा हद्द ते नांदूर पठार पिंपळगाव रोठा कान्हूर (अहमदनरगर जिल्हा इजिमा-१३३) ला जोडणारा रस्ता लांबी १८ कि.मी व नवीन प्रमुख जिल्हा मार्ग २३२ , संतवाडी खपरेमळा पिंपरीमळा आळे (रा.मा.क्र.२२२) भटकळवाडी वडगांव कांदळी खैरेवाडी हिवरे तर्फे नारायणगाव ते प्रजिमा-४८ पर्यंत रस्ता २१ कि.मी लांबी व नवीन प्रमुख जिल्हा मार्ग २३३,

मांजरवाडी खोडद प्रजिमा ९ ते प्रजिमा ८ ते वडगाव कांदळी रस्ता १२ कि.मी लांबी व नवीन प्रमुख जिल्हा मार्ग २३४ , रा.मा.क्र.२२२ ते पिंपळगांव जोगा सांगनोरे कोल्हेवाडी खिरेश्वर रस्ता १४ कि.मी लांबी व नवीन प्रमुख जिल्हा मार्ग २३५ , रा.मा. १११ ते गोद्रे आलमे बल्लाळवाडी ते रा.मा.क्र.२२२ ला जोडणारा रस्ता १५ कि.मी लांबी व नवीन प्रमुख जिल्हा मार्ग २३६ , प्रजिमा-६ पासून पिंपरवाडी डेंगळेवाडी उंबरवाडी हिवरे ता. जुन्नर रस्ता ते राळेगण प्रजिमा-६ ला मिळणारा रस्ता १० कि.मी लांबी व नवीन प्रमुख जिल्हा मार्ग २३७,

जुन्नर (रा.मा. १११) पासून खोरे वस्ती धामणखेल निमदरी ते प्रजिमा-१५६ ते विठ्ठलवाडी तुकारामवाडी रस्ता कि.मी व नवीन प्रमुख जिल्हा मार्ग २३८ आदि रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग दजोन्नत्ती म्हणून शासनाने मान्यता दिली असून या रस्त्यावर शासनाच्या माध्यमातून आगामी अधिवेशनात पुरवणी मागण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे