ओतुरच्या शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये नवमतदार नोंदणी मोहिम

1 min read

ओतुर दि.१४:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग डुंबरवाडी ओतूर येथील महाविद्यालयात दि.१४ रोजी नव मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने २५ तर ऑफलाईन पद्धतीने ३० विद्यार्थ्यांची अशी एकूण जवळपास ५५ विद्यार्थ्यांची नवमतदार नोंदणी करण्यात आली. विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभागांच्या अंतर्गत नव-मतदार नोंदणीसाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत ओटर हेल्पलाईन या ॲप वर संपूर्ण नवमतदार नोंदणी प्रक्रियेचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना देण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.यु.खरात यांनी नवमतदार नोंदणी का करावी तसेच आपला मतदानाचा हक्क बजावताना योग्य अशा तज्ञ आणि देशाला पुढे घेऊन जाणारा उमेदवार निवडून दयावा जेणेकरून आपल्या राज्याची तसेच देशाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होण्यास मदत होईल. अशाप्रकारचे मार्गदर्शन विदयार्थाना केले. त्यावेळी संगणक विभागप्रमुख डॉ सुनिल खताळ, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख डॉ सुनीलकुमारसर, महाविद्यालय विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ मोनिका रोकडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा.स्वप्नील डुंबरे, तसेच इतर प्राध्यापक वृंद व सर्व महाविदयालयीन विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे