जुन्नर तालुक्यातील बिबट सफारीचा मार्ग मोकळा; निधी उपलब्ध करून देण्याची मंत्रालयातून सूचना

1 min read

जुन्नर दि.११:- जुन्नर तालुक्यातील बिबट सफरीचा मार्ग मोकळा झाला असून सफारीसाठी मंत्रिमंडळाची मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याचे पत्र मुंबई मंत्रालयातील उपसचिव गजानन पाटील यांनी दिले आहे. सदर माहिती वन विभागाचे प्रधान सचिव तसेच जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांना पत्र देऊन कळवण्यात आले आहे. सदर पत्रात म्हटले आहे की जुन्नर बिबट सफारी करता डीपीआर सादर करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही बिबट सफारी लवकरात लवकर होण्यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून सातत्याने मागणी होत आहे. तरी या बिबट सफारीस मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असे उपमुख्यमंत्री महोदय वित्त व नियोजन यांचे निर्देश आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्याची विनंती आहे.

आमदार अतुल बेनके म्हणाले महाविकास आघाडीचे सरकार असताना नियोजित बिबट सफारीच्या डी पी आर साठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. आंबेगव्हाण येथील 59 हेक्टर पैकी 24 हेक्टर क्षेत्रात बिबट सफारी तयार करण्यासाठी डी पी आर तयार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री व तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिबट सफारीसाठी 80 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.

अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बिबट सफारीस मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देऊन आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. असे निदेश दिले आहेत. याबाबतचे पत्र 6 सप्टेंबर 2023 रोजी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव गजानन पाटील यांनी प्रधान सचिव (वने), महसूल व वन विभाग यांना दिले आहे. या पत्राची प्रत आमदार अतुल बेनके यांनाही देण्यात आले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे