रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल कडून शिक्षकांचा सन्मान
1 min read
आळेफाटा दि.७:- रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल ने ५ सप्टेंबर शिक्षक दिन हा दिवस आळेफाटा व आळेफाटा परिसरातील शंभरहून अधिक शिक्षकांचा भेटवस्तू आणि सन्मानपत्र देऊन सन्मान केला.५ सप्टेंबर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस तो आपल्या देशामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षकांप्रती आपला असलेला आदर. आणि गुरुजनांचा सन्मान म्हणून रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रल ने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळेफाटा, शिवछत्रपती विद्यालय आळेफाटा, रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालय वडगाव आनंद तसेच ग्लोबल लक्झरीया व शुभम तारांगण व पंचक्रोशीत असणाऱ्या सर्व शिक्षकांचा भेटवस्तू आणि सन्मानपत्र देऊन सन्मान केला.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रलचे अध्यक्ष विजयकुमार आहेर, उपाध्यक्ष संभाजी हाडवळे, सचिव पराग गांधी, माजी अध्यक्ष ज्ञानेश जाधव, संस्थापक महावीर पोखरणा, हेमंत वाव्हळ व सर्व रोटरीयन्स यांनी एकत्र येऊन शिक्षकांचा सन्मान केला.