निमगाव सावात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
1 min readनिमगाव सावात दि.७:- जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमार घटनेच्या निषेधार्थ निमगाव सावा (ता.जुन्नर) येथील व्यापा-यांणी आज गुरुवार दि.७ रोजी कडकडीत बंद पाळला. मराठी समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक वर्षापासून राज्यातील मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताणा सराटी- जालना येथे मराठा समाजाच्या वतीने शांततेत आंदोलन चालु असताणा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. या घटनेचा निषेध करण्यासाठी व आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थांनी कडक बंद पाळला. बंद शांततेत पाळण्यात आल्या असून १०० टक्के व्यापारी बंदात सहभागी झाले असल्याची माहिती गावचे सरपंच किशोर घोडे यांनी दिली.