आण्यात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
1 min read![](https://shivneriexpress.in/wp-content/uploads/2023/09/IMG-20230906-WA0015.jpg)
आणे दि.६:-सराटी- जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमार घटनेच्या निषेधार्थ आणे (ता.जुन्नर) येथील व्यापा-यांणी बुधवार दि.६ रोजी कडकडीत बंद पाळला. मराठी समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक वर्षापासून राज्यातील मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना. सराटी- जालना येथे मराठा समाजाच्या वतीने शांततेत आंदोलन चालु असताणा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. या घटनेचा निषेध करण्यासाठी व आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थांनी कडक बंद पाळला.बंद शांततेत पाळण्यात आल्याची माहिती गावच्या सरपंच प्रियांका दाते यांनी दिली.
दरम्यान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आळेफाटा, आळे, वडगाव आनंद, राजुरी, गुंजाळवाडी या गावातील व्यापा-यांणी, ग्रामस्थांणी बंद पाळत आंदोलनाला पाठिंबा दिला.तसेच कुठल्याही प्रकारचा अनुसुचित प्रकार घडु नये यासाठी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.