जालन्याच्या घटनेचे गुंजाळवाडीत पडसाद; शांततेत आंदोलन

1 min read

गुंजाळवाडी दि.६:- जालना जिल्ह्यात झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांवरती लाठी चार्ज च्या निषेधार्थ गुंजाळवाडी (ता. जुन्नर) येथे बुधवार दि.६ सकाळी शांततेत आंदोलन करण्यात आले. दुष्काळी पार्श्वभूमी पाहता दुकाने न बंद ठेवता ग्रामस्थांनी गावच्या ग्रामपंचायतीच्या समोर सर्वांनी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध व्यक्त करून मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा दिला.‘ एक मराठा, लाख मराठा’, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा विविध घोषणा देत शांततेत आंदोलन केले. पोलीस आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे तसेच गुंजाळवाडी चे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्वांनी जालनाच्या आंदोलकांवरती झालेल्या लाठी चार्ज चा तीव्र निषेध व्यक्त केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे