साकोरीत ‘शिवजन्मभुमी’ पतसंस्थेच उद्घाटन संपन्न; अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा

1 min read

साकोरी दि.४:- साकोरी (ता.जुन्नर) येथे ‘शिवजन्मभुमी नागरी सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा हभप तुळशीराम महाराज सरकटे व आमदार अतुल बेनके यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाला. जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, चेअरमन वसंत जगताप, कृ.बा. स.संचालक देवदत्त निकम, सावकार पिंगट, सरपंच सचिन उंडे, बेल्हे गावचे माजी सरपंच गोरक्षनाथ वाघ, अशोक घोडके, साकोरी गावच्या सरपंच , उद्योजक संभाजी चव्हाण, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आशिष बबन नेहरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन गावचे माजी सरपंच व विद्यानिकेतन स्कुल चे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग मनाजी साळवे यांनी केले.या वेळी संस्थेचे पदाधिकारी विजय यशवंत साळवे (उपाध्यक्ष), प्रकाश महादेव वाळुंज (खजिनदार),विलास बापुराजे पिंगट (सचिव) आहेत. दिनकर तुकाराम वायकर,सचिन गणपत गोल्हार, संजय हौशीराम विश्वासराव, शहाजी पांडुरंग साळवे (तज्ञ संचालक). मंगेश गेनभाऊ आतकरी (तज्ञ संचालक), प्रल्हाद भानुदास साळवे, मंदा बाबाजी पानसरे, अर्जुन भगवान बनकर, प्रकाश अभिमन्यु गाडगे, मनिषा गणेश नेहरकर, अभिषेक सुदाम पानसरे, पांडुरंग मारुती गाडगे, बजरंग केरू साळवे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे