समर्थ शैक्षणिक संकुलात चांद्रयान-३ वर मार्गदर्शनपर व्याख्यान; ती शेवटचे १० ते १५ मिनिटे सर्वांसाठीच कठीण होते:- इस्रो शास्त्रज्ञ मयुरेश शेटे
1 min readबेल्हे दि.३:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे नुकतेच चांद्रयान तीन या विषयावर मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. इस्रो या जगप्रसिद्ध संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असणारे मयुरेश शेटे तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.शास्त्रज्ञ मयुरेश शेटे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चात्मक संवाद साधला.विद्यार्थ्यांनी कुतूहलाने विचारलेल्या चांद्रयान-३ मोहिमेसंदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.चांद्रयान मोहीम-३ विषयी अनुभव कथन करताना मयुरेश शेटे म्हणाले की ती शेवटची १० ते १५ मिनिटं सर्वांसाठीच फार कठीण होते,वातावरण अतिशय तणावपूर्ण होते.प्रज्ञान रोवर जेव्हा व्यवस्थितपणे चंद्रावर लँडिंग झाले त्यावेळेस सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. इस्रोसाठी आणि सर्व भारतवासीयांसाठी हा ऐतिहासिक कामगिरीचा विजय मनस्वी आनंद मिळवून देणारा होता.
इस्रोमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांनी प्रथमता आपल्या मनातील न्यूनगंड जो आहे तो काढून टाकला पाहिजे.इस्रो मध्ये काम करणारे बहुतांशी कर्मचारी हे ग्रामीण भागातील आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिल्यानंतर इस्रोच्या कॉलेजमध्ये देखील त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.सदरचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्लेसमेंट ची संधी मिळू शकते.तसेच इस्रोच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या मार्फत देखील विद्यार्थ्यांना इसरो मध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.यशस्वी होण्यासाठी आई-वडिलांप्रती आदर ठेवा,भरपूर अभ्यास करा,मेहनत करा,जिद्द ठेवा,आणि सर्वात आधी आपले ध्येय निश्चित करा असा संदेश इंजिनियरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना मयुरेश शेटे यांनी दिला. समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने यावेळी इस्रो शास्त्रज्ञ मयुरेश शेटे व त्याचे वडील माजी प्राचार्य कैलास शेटे या दोघांचाही शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,सर्व विभागाचे प्राचार्य,विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियांत्रिकीचे प्राचार्य प्रा.डॉ.धनंजय उपासनी यांनी तर सूत्रसंचालन व आभार इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा.निर्मल कोठारी यांनी मानले.