कल्याण – नगर महामार्गावर पिकअप च्या धडकेने एकाचा मृत्यू
1 min readराजुरी दि.३०:- कल्याण – नगर महामार्गावर राजुरी (ता. जुन्नर) येथे आज पहाटे पिकअप चालकाला झोप लागल्याने पिकअप एका चहाच्या टपरीवर मध्ये शिरल्याने पिकअप ची धडक लागून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सत्तार दाऊद मुजावर (वय 55 राहणार राजुरी) हे चहाच्या टपरी समोरील टेबल पुसत असताना महामार्गावरून जाणारा महिंद्रा कंपनीचा पिकअप एमएच ४५ एफ ४४७६ हा सलाउद्दीन दर्ग्याजवळील चहाच्या टपरीमध्ये घुसल्याने त्याची जोरदार धडक बसून सत्तार दाऊद मुजावर यांचा मृत्यू झाला.
याबाबत पिकअप चालक नवनाथ भगवान पालवे (वय 32 राहणार कोल्हार, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर) यावर आळेफाटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नजीर मोहम्मद शेख वय ६२,राहणार राजुरी यांनी आळेफाटा पोलिसांत फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनासाठी पोलीस हवालदार गोसावी करत आहेत.