आजपासून घरगुती गॅस २०० व ४०० रुपयांनी स्वस्त; मोदी सरकारचा मोठा निर्णय

1 min read

नवी दिल्ली दि.३०- केंद्र सरकारने मंगळवारी घरगुती गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलो) दरात २०० रुपयांची कपात केली आहे. तर उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गॅस ४०० रुपयांनी स्वस्त झाला आहे. यासह आता सिलिंडरची किंमत दिल्लीत ११०३ रुपयांवरून ९०३ रुपये, भोपाळमध्ये ९०८ रुपये, जयपूरमध्ये ९०६ रुपयांवर आली आहे. नवीन किंमत आज ३० ऑगस्टपासून म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी लागू होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या पूर्वी मार्चमध्ये दरात बदल मार्च २०२३ मध्ये १४.२ किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर दिल्लीत त्याची किंमत ११०३. रुपये झाली होती. यापूर्वी ६ जुलै २०२२ रोजी किमती बदलण्यात आल्या होत्या. त्यानंतरही भावात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले की, ओणम आणि रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी किमती कमी करून पंतप्रधान मोदींनी भगिनींना मोठी भेट दिली आहे. देशातील ३३ कोटी ग्राहकांना त्याचा लाभ मिळणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे