‘ऑल द बेस्ट चांद्रयाण’ अवघ्या देशाची नजर आज चंद्रावर

1 min read

मुंबई दि.२३ :- चांद्रयान ३ च्या लँडिंगची प्रक्रिया आज २३ ऑगस्टला संध्याकाळी ५:४५ ला सुरू होईल. चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ ६:०४ ला उतरेल. डीडी नॅशनल आणि इस्रोच्या सोशल मीडियावर लँडिंगची प्रक्रिया संध्याकाळी ५:२७ पासून लाइव्ह पाहता येईल. देशभरातील शाळा- महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ही ऐतिहासिक घटना पाहण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन इस्रो ने केले आहे.या निमित्त आज देशभर विविध ठिकाणी प्रेक्षपण व विविध कार्यक्रम असणार आहेत.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेची तिसरी अभ्यासात्मक चांद्र मोहीम असलेले चांद्रयान- ३ आज बुधवार, २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. हा क्षण अधोरेखित करण्यासाठी अनेक संस्थांनी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

एनएफडीसी- नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया, पुणे यांनी लॉ कॉलेज रोडवरील एनएफडीसी-एनएफएआव थिएटर येथे आणि एनएफडीसी- नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा, मुंबई यांनी पेडर रोडवरील एनएफडीसी-एनएमआयसी मधील जेबी हॉलमध्ये चांद्रयान- ३ च्या सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण आयोजित केले आहे.

बुधवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून एनएफडीसी-एनएफएआय आणि एनएफडीसी-एनएमआयसी परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या ठिकाणी संध्याकाळी ५.२७ पुणे विद्यापीठातील इस्रो विभागाचे संचालक डॉ. अरविंद डी आणि प्रशिक्षण केंद्रांसह पुण्यामधील वाजता चांद्रयान-३ च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण सुरू होईल.

एनएफएआयमधील कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पुणे शहरातील विद्यार्थी अत्यंत उत्सुक आहेत. मुंबईत एनएमआयसी इथल्या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि विविध क्षेत्रात काम करणारे मुंबईकर उपस्थित राहणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे