मोठी बातमी! दोन हजार रुपयांच्या नोटा बंद; ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करा
1 min readमुंबई दि.१९- नोटबंदीच्या निर्णयानंतर आता एक आणखी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयने घेतलेल्या या निर्णयानुसार २ हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे २ हजार रुपयांच्या नोटा आहेत त्यांना त्या बँकेमध्ये जाऊन जमा करण्याची मुभा देण्यात येणार आहे. यासाठीची अखेरची मुदत ३० सप्टेंबर २०२३ असणार आहे.
याबाबतचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता २ हजार रुपयांच्या नोटा बँकेमध्ये जमा कराव्या लागणार आहेत.
नोटबंदीनंतर बाजारात आलेली २ हजारांची नोट –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानंतर २ हजारांची चलनी नोट बाजारात आणण्यात आली होती. यापूर्वी १ हजार रुपयांची नोट ही सर्वाधिक मूल्याची नोट होती.
२ हजारांच्या नोटेवर अनेक आक्षेप –
केंद्रातील मोदी सरकारने, भ्रष्टाचाराच्या विरोधात मोहीम उघडत असल्याचे सांगत नोटबंदीचा निर्णय घेतला होता. नोटबंदीनंतर २ हजारांचे चलन बाजारात आणण्यात आले होते. २ हजारांचे चलन बाजारात आणल्याने काळा पैसा लपवण्यास आणखीनच मदत होईल अशा प्रतिक्रिया त्यावेळी उमटल्या होत्या.