ब्रेकींग : सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; यंदाच्या निकालातही मुलींनी मारली बाजी
1 min readदिल्ली दि.१२:- सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर झाला असून यंदा बारावीमध्ये 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत 6 टक्क्यांनी जास्त आहे. बारावीच्या परीक्षेत 90.68 टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 84.67 टक्के आहे. मागील वर्षी सीबीएसई बोर्डात 91.25% मुले उत्तीर्ण झाली होती, तर यावर्षी फक्त 84.67% मुले उत्तीर्ण झाली आहे.
गेल्या वर्षी 94 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या होत्या, तर यावर्षी केवळ 90.68 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. म्हणजेच यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घट झाली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन cbse.gov.in आणि cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी बारावीचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर टाकावा लागेल. निकाल कसा तपासायचा ते तुम्ही खाली पाहू शकता.
CBSE 12th Result 2023 : निकाल कसा पाहाल
स्पेट 1 : CBSE ची अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in ला भेट द्या.स्टेप 2 : मेन पेजवर, ‘CBSE बारावी निकाल डारेक्ट लिंक’ वर क्लिक करा.स्टेप 3 : लॉगिन पेज ओपन होईल, इथे विद्यार्थ्यांनी त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख एन्टर करावी.स्टेप 4 : तुमचा CBSE बोर्ड निकाल स्क्रीनवर दिसेल, तो तपासा.स्टेप 5 : विद्यार्थी इथून निकालाची डिजिटल प्रत डाऊनलोड करू शकतात आणि त्यांच्याकडे ठेवू शकतात.