भारताने लोकसंख्येत चीनला टाकले मागे; भारत लोकसंख्येत जगात नंबर वन

1 min read

दिल्ली दि.१९:- भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला असून भारताने लोकसंख्येच्या बाबतीत अव्वल असणाऱ्या चीनला मागे टाकलं आहे.

युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या अहवालानुसार, भारत-चीनमध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा एक तृतीयांश लोक आहेत. या अहवालानुसार भारताची लोकसंख्या 142.86 कोटी झाली असून चीनची 142.57 कोटी नोंदवण्यात आली आहे. तर जगाची लोकसंख्या आता 8 अब्जांच्या पुढे गेली आहे. भारताचा प्रजनन दर सरासरी 2.0 नोंदवण्यात आला आहे, तर सरासरी आर्युमान पुरुषांसाठी 71 वय तर महिलांसाठी 74 वय आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे