ज्ञानदिप पतसंस्थेच्या वतीने सभासदांना १० टक्के लाभांश; संस्थेला ४३ लाख रुपयांचा नफा
1 min readराजुरी दि.२९:- राजुरी (ता.जुन्नर) येथील ज्ञानदिप नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक पंचायत समितीचे माजी सभापती दिपक औटी यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.संस्थेच्या राजुरी, आळेफाटा, वारूळवाडी या ठिकाणी तीन शाखा असुन सभासद संख्या ३४१५ असुन भागभांडवल ३ कोटी, निधी २ कोटी ४१ लक्ष, स्वनिधी ४ कोटी ६४ लक्ष, खेळते भांडवल ५७ कोटी ९६ लक्ष,
गुंतवणूक १४ कोटी ७२ लक्ष, कर्ज ४० कोटी ५० लक्ष, ठेवी ५० कोटी २० लक्ष आहे.संस्थेला ४३ लक्ष नफा झालेला असुन संस्थेला अ वर्ग मिळालेला आहे. सभासदांना १० टक्के लाभांश व दिपावली शुभेच्छा भेट वस्तु देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सूत्रसंचालन रमेश औटी यांनी केले व अहवाल वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल.कणसे यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गोरक्ष हाडवळे, गावच्या सरपंच प्रिया हाडवळे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व राजुरी गावचे उपसरपंच माऊली शेळके. संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश औटी, सचिव रमेश औटी, खजिनदार शरद सरोदे, संचालक दत्तात्रय हाडवळे, राजेंद्र हाडवळे, संतोष कणसे, शरद आल्हाट, अशपाक चौगुले, संगीता घंगाळे, मनिषा औटी, वल्लभ शेळके, शरदचंद्र पतसंस्थेचे अध्यक्ष एम.डी.घंगाळे, एकनाथ शिंदे,चंद्रकांत जाधव, बाळासाहेब औटी, ज्ञानेश्वर गटकळ, मुरली औटी, विवेक शेळके, राजू औटी.गोविंद औटी,मोहन हाडवळे, जंगल कोल्हे, विक्रम डुंबरे, वसंतदादा हाडवळे, अविनाश पा.औटी, संजय पिंगळे, वामन भाऊसाहेब, मुक्ता विष्णू औटी, तुकाराम डुंबरे, बाळासाहेब गुंजाळ, गंगाशेठ गटकळ, दिनेश कणसे, अरुण लोहोट, अभिषेक भुजबळ, पोपट गुंजाळ,भरत घंगाळे, नंदकुमार हाडवळे, सीता वाघोले, संस्थेचे राजुरी, वारूळवाडी, आळेफाटा शाखेचे सर्व सल्लागार मंडळ, सभासद आदी मान्यवर, गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.