आळेफाटा येथे ‘संजीवन रेस्टॉरंट’ या नूतन व्यवसायाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

1 min read

आळेफाटा दि.२८:- ‘संजीवन रेस्टॉरंट’ या नूतन व्यवसायाचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवार दि.२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या वेळी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार,शरद लेंडे, शरद अण्णा चौधरी यांसह पुणे जिल्ह्यातून व इतर जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. आळेफाटा (ता.जुन्नर ) येथील आनंद प्लाझा येथे हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आपल्या सेवेत नव्याने दाखल झाले आहे.हॉटेल मॅनजमेंटचे व्यावसायिक शिक्षणासह व अनुभवी स्टाफ असून उत्तम सेवा, स्वादिष्ट व रुचकर जेवण हे हॉटेलच मुख्य वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी भव्य अशी पार्किंग व्यवस्था, मीटिंगसाठी एसी हॉल, बर्थडे साठी सुशोभित स्टेज तसेच सेल्फी पॉइंट अश्या सुविधा उपलब्ध आहेत.सर्व उपस्थितांचे आभार अशोक गुंड, विश्वास गुंड, हर्षल गुंड व समस्त गुंड परिवाराने मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे