पांडुरंग पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणे पठार दुष्काळ ग्रस्त भागासाठी १० टन हिरवा चारा

1 min read

निमगाव सावा दि.२७:- पांडुरंग पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणे (ता.जुन्नर) पठारावरील दुष्काळग्रस्त गावातील जनावरांसाठी २० टन हिरवा चारा वाटप केला.जुन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीत असल्याने जनावराच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.आणे पठारावरील आणे, नळवणे, शिंदेवाडी,पेमदरा, व्हरुंडी भागामध्ये दुष्काळी परिस्थिती असून पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जून महिन्यात थोड्याफार पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांचे पीक पावसा अभावी करपून गेले आहे. शासनाच्या वतीने चारा छावण्या सुरू करण्याचं काम प्रगती पथावर असून तात्पुरती मदत सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, नेते, पतसंस्था मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. पांडुरंग पवार यांनी वाढदिवसानिमित्त चारा वाटप केल्याने पठार भागातील शेतकऱ्यांनी पवार यांचं आभार मानले. या वेळीयुवा नेते अमित बेनके, भीमाशंकर सहकारी कारखाना व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, सरपंच निमगाव सावा किशोर घोडे, सरपंच औरंगपुर माया पोपट कामठे, युवा नेते पाटीलबा गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते, संदीपान पवार, चेअरमन पांडुरंग पतसंस्था परशुराम लगड, हरिदास पवार,वासुदेव पवार, अनिल गाडगे तसेच आणे, शिंदेवाडी,पेमदरा गावचे शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे