जुन्नर तालुक्यातील वळण बंधाऱ्यांच्या कामासाठी १० कोटी २२ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर

1 min read

जुन्नर दि.२६:- खासदार डॉ. अमोल कोल्हे व जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या विशेष प्रयत्नातून जुन्नर तालुक्यातील वळण बंधारे कामाच्या मंजुरीसाठी सुमारे १० कोटी २२ लाख ६६ हजार रुपयांचे अंदाजपत्रक जलसंधारण महामंडळ औरंगाबाद यांच्याकडे सादर केल्याची माहिती जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँगेस चे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी दिली. तालुक्यातील खालील २६ बंधाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये खामुंडी Gated CNB नंबर १,२,३,४ (अंदाजे रक्कम १ कोटी ७४ लाख), गुळंचवाडी नंबर १,२ (अंदाजे ६८ लाख), आम्ले नंबर १,२,३ (अंदाजे ८४ लाख), पिंपरी पेंढार नंबर १ (२४ लाख), धामणखेल नंबर १,२,३ (२ कोटी ७९ लाख), बोरी बुद्रुक नंबर १,२,३ (१ कोटी ४१ लाख), राजुरी नंबर १,२ (९६ लाख). काळवाडी नंबर १ (४५ लाख), चिंचोली नंबर १(४७ लाख), पिंपळवंडी नंबर २, ३,४ (१ कोटी ३० लाख) सानवळे नंबर १ (५९ लाख), खोडद नंबर १ (२६ लाख), मंगरुळ नंबर १ (३९ लाख)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे