“शिवनेरी एक्सप्रेस” च्या बातमीची आमदार व पाटबंधारे विभागाने घेतली दखल; पिंपळगाव जोगा कालव्याला सोडले पाणी
1 min readबेल्हे दि.१२:-पिंपळगाव जोगा कालव्याला पानी सोडन्यात यावे अशी मागणी शेतकरी पांडू संगमनेरकर, जालींदर गायकवाड, शिवाजी डुंबरे, सुरेश तिकोने यांनी केली होती.या सबंधित “शिवनेरी एक्सप्रेस” ने दि.१२ ऑगस्ट रोजी “पिंपळगाव जोगा कालव्याला पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी; जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर” या मथळ्या खाली बातमी प्रसिद्ध केली होती.
सबंधित बातमीची दखल घेत तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता यांना दि.२० ऑगस्ट रोजी पाणी सोडणे बाबत पत्रव्यवहार केला होता. पाटबंधारे खात्याने याची तत्काळ दखल घेऊन आज दि.२४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता पिंपळगाव जोगा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.
त्यामुळे जुन्नर,पारनेर तालुक्यातील जनतेला आधार मिळाला आहे. जुन्नर तालुक्याच्या पुर्व पट्यात पाऊस नसल्याने आळे, राजुरी, बेल्हे, बांगरवाडी, उंचखडक, गुंजाळवाडी, रानमळा पट्टयातील पिके धोक्यात आहेत. खरीप हंगामात पेरलेली पिके करपू लागले आहे. ज्या थोड्या पावसावर शेतकर्यांनी पेरन्या केल्या ते पिक जळुन जाण्याच्या मार्गावर आहे. तसेच विहिरी, कूपनलिका, कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.आज कालव्यातून पाणी सोडल्यामुळे कालव्याच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.