भास्कर गाडगे यांच्या माध्यमातून आणे पठारावरील जनावरांसाठी १० टन हिरवा चारा
1 min readबेल्हे दि.२४:- कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर चे संचालक व शिव सहकार सेना जुन्नर तालुका अध्यक्ष भास्कर गाडगे यांनी आणे पठार पेमदरा (ता.जुन्नर) या दुष्काळ ग्रस्त भागातील जनावरांसाठी १० टन हिरवा चारा दिला.
गाडगे यांनी पेमदरा चे गावचे उपसरपंच बाळासाहेब दाते,विभाग प्रमुख पांडु गाडेकर, कैलास देशमुख यांच्या कडे हा चारा सपूर्द केला.जुन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीत असल्याने जनावराच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.आणे पठारावरील आणे, नळवणे, शिंदेवाडी, पेमदरा, व्हरुंडी भागामध्ये दुष्काळी परिस्थिती असून पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जून महिन्यात थोड्याफार पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांचे पीक पावसा अभावी करपून गेले आहे. शासनाच्या वतीने चारा छावण्या सुरू करण्याचं काम प्रगती पथावर असून तात्पुरती मदत सामाजिक कार्यकर्ते,सामाजिक संस्था, नेते, पतसंस्था मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.