तंटामुक्तीच्या अध्यक्षा वरून आणे ग्रामपंचायतीत गदारोळ
1 min readआणे दि.२७:- आणे (ता.जुन्नर) येथे १५ ऑगस्ट ची होणारी ग्रामसभा ही रविवार दि.२७ रोजी घेण्यात आली. ग्रामसभेत विविध विषयावरती चर्चा झाली. शेवटी तंटामुक्ती समिती व तंटामुक्तीच्या अध्यक्षांची निवड करण्याच्या वेळी या ग्रामसभेत गदारोळ झाला.
त्यामुळे सरपंच प्रियंका दाते यांनीही सभा तहकुब करत असल्याचं जाहीर केले. यावर अनेक गावचे माजी उपसरपंच किशोर आहेर यांनी सर्व ग्रामस्थ नाराज झाली तसेच कोरम पूर्ण असून सुद्धा ग्रामसभा झाली नाही अशी खंत व्यक्त केली.
यामध्ये ग्रामस्थांचा व लोकशाहीचा अपमान झाला असे रंगनाथ आहेर,बाळासाहेब दाते,गणेश आहेर, शिताराम दाते,वैभव आहेर,किशोर आहेर यांनी सांगितले.
” सभेत सर्व विषयांवर शांततेत चर्चा झाली परंतु शेवटी तंटामुक्तीच्या अध्यक्ष निवडी वेळी गदारोळ झाला. त्यामुळे ही ग्रामसभा तहकूब केली. लवकरच विशेष ग्रामसभा घेऊन तंटामुक्ती समिती व अध्यक्ष ची निवड करण्यात येईल.”
प्रियंका दाते
सरपंच आणे
” ग्रामसभेमध्ये शेवटचा विषय म्हणून काम तंटामुक्ती समितीची निवड करण्याचे ठरले अर्जाचे वाचन झाल्यावर चर्चा सुरू झाली. आपल्याच गटाचा तंटामुक्ती अध्यक्ष होणार नाही हे लक्षात आल्यावर चर्चामध्ये थांबून सभा तहकूब करण्याचा निर्णय सरपंच प्रियांका दाते यांनी घेतला. हा निर्णय बेकायदेशीर असून लोकशाहीच्या विरोधात आहे. त्यामुळे आम्ही याविषयी कायदेशीर लढा देणार आहोत.”
किरण आहेर
ग्रामस्थ आणे