जुन्नर तालुक्यात ६ ठिकाणी ३३/११ के.व्ही विद्युत उपकेंद्र मंजूर करण्याची आमदार अतुल बेनके यांची मागणी

1 min read

पुणे दि.२१:- जुन्नर तालुक्यात आर.डी.एस.एस योजनेअंतर्गत ६ ठिकाणी ३३/११ के.व्ही विद्युत उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणचे पुणे परिमंडल मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी दिली.पांडुरंग पवार यांनी सांगितले की आमदार अतुल बेनके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जुन्नर तालुक्यातील वीजेची समस्या सोडविण्यासाठी आर.डी.एस.एस योजने अंतर्गत मंगरुळ , उंचखडक, व्हरुंडी (शिंदेवाडी), माणिकडोह, घाटघर.बोरी बु.या ठिकाणी ३३/११ के.व्ही विद्युत उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी केली असल्याचे पांडुरंग पवार यांनी सांगितले. या वेळी आमदार अतुल बेनके, राष्ट्रवादी जुन्नर तालुका प्रमुख पांडुरंग पवार, झापवाडी सरपंच सचिन उंडे, रानमळा चे सुरेश तिकोने, दत्ता लामखडे उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे