कोळवाडीच्या जिल्हा परिषद शाळेचे सातवीचे विद्यार्थी ३० वर्षांनी एकत्र

1 min read

आळेफाटा दि.२१:- कोळवाडी (ता.जुन्नर) येथील ज्ञानेश्वरवस्तीवर असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सन १९९२-९३ इयत्ता ७ वी मधील ४० माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा साजरा करण्यात आला. तब्बल ३० वर्षानंतर सर्व वर्गमित्र एकत्रित आल्याने वातावरण भारावून गेले होते. तत्कालीन सातवीच्या वर्ग मित्र व मैत्रिणी आज वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत. या स्नेहमेळाव्यामुळे सोनेरी आयुष्यातील रुपेरी आठवणी जागृत झाल्या व तसेच अनेकांना गहिवरून आले. व्हाटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून सर्व तत्कालीन विद्यार्थी यांना संघटित करून हा स्नेहमेळावा आपल्या गुरूजनांच्या साक्षीने आयोजन केले होते. बराच वर्षानंतर जुने वर्गमित्र भेटल्याने गप्पांना, थट्टामस्करीला उधाण आलं होतं. या स्नेहमेळाव्यात त्या वेळचे शिक्षक स मा कु-हाडे आणि रमेश बहिरट या शिक्षकांचा उपस्थित विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सकाळपासून संध्याकाळ पर्यंत ओळख, स्नेहभोजन तसेच दा-या घाट या ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या आठवणींना उजाळा देत प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले. या स्नेह मेळाव्यासाठी शरद मामा गाढवे, रविंद्र गुंजाळ, विजय गुंजाळ,महेंद्र पारवे,उत्तम सहाने, उर्मिला गुंजाळ,राजेश कणसे आनंथा गलांडे,रोहिणी शेळके, प्रतिभा सहाने,सुवर्णा हाडवळे,संगिता दिघे, सुरेखा येंधे, सुवर्णा घोरपडे,सुलभा काळे,अनुराधा डावखर,भिमा गुंजाळ,मनिषा गाढवे,संदिप पाडेकर,रेखा सहाने, सुनिता गुंजाळ,रमेश दिघे,कावेरी पाडेकर,महेंद्र सहाने,सुनिल कु-हाडे ,मंगल निमसे,दत्ता सहाने,रेवन दिघे,शरद गाढवे,मनिषा सहाने,छाया पाडेकर,कविता दिघे,रतन दिघे,अनिता गाढवे,सुवर्णा शेळके,मधु आहेर हे सर्व माजी विद्यार्थी उपस्थीत होते.कु-हाडे गुरूजी यांनी मोलाचं मार्गदर्शन करताना एकत्र राहण्याचा सल्ला देत असताना सर्व माजी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे