शेतात घास कापायला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकावर रान मांजराचा हल्ला
1 min read
रानमळा दि.१९:- रानमळा (ता. जुन्नर) येथील काशिनाथ गुंजाळ (वय ७५) यांच्यावर रानमांजराने हल्ला करून जखमी केले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुंजाळ हे आज शनिवार दि.१९ सकाळी १० वाजता घराजवळील शेतात घास कापण्यासाठी गेले असता शेजारच्या शेतात दबा धरून बसलेल्या रानमांजराने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. गुंजाळ यांनी प्रतिहल्ला व आरडाओरड केली असता मांजराने पळ काढला. गुंजाळ हे या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
या हल्यात त्यांच्या पायाला मांजराचे डास लागले आहेत.हल्ल्याची माहिती समजताच वनविभागाने गुंजाळ यांची भेट घेऊन चौकशी केली.
“पायाला डास गेल्याने प्राथमिक उपचार व लसीकरण केले आहे. चार ते पाच लसीचे डोस देणे गरजेचे आहे. पुढील उपचारासाठी त्यांना सोमवारी बोलवण्यात आले असून सध्या त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.”
डॉ. शिवाजी फड
वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, बेल्हे