खासदार डॉ.अमोल कोल्हे उद्या जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर

1 min read

जुन्नर दि.१७:- शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल बेनके हे उद्या शुक्रवार दि.१८ जुन्नर तालुक्यातील अंदाजे २४ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे व रस्त्याचे भूमिपूजन करणार आहेत.सकाळी 10 वाजता ओतूर-पानसरेवाडी रस्त्याचे भूमीपूजन, 11:15 वाजता (डोमेवाडी),ओतूर – डोमेवाडी रस्त्याचे भूमीपूजन, दु. 12 वाजता पिंपळवंडी हायवे चौक आळे भटकळवाडी वडगाव कांदळी ते हिवरे तर्फे नारायणगाव रस्त्याचे भूमीपूजन, दु.२ वा. (बोरी बु.) बोरी बु. ते राजुरी उंचखडकवाडीचे रस्त्याचे भूमी, दु. 4 वा. (बेल्हे) बेल्हे- कोंबरवाडी रस्त्याचे भूमीपूजन, सायं. 5:30 वा. (खोडद) खोडद ते रा.मा. (निमगाव सावा) रस्त्याचे भूमीपूजन, सायं. 6:45 वा. (हिवरे तर्फे नारायणगाव), हिवरे तर्फे नारायणगाव हिवरे सातपुडा रस्त्याचे भूमीपूजन, सायं 7 वा. (नारायणगाव) खोडद – नारायणगाव वारुळवाडी ते तालुका हद्द रस्त्याचे भूमीपूजन असा नियोजित कार्यक्रम असणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे