आळेफाटा येथील शुभम तारांगण हरित गृह प्रकल्प ठरतोय रोल मॉडेल

1 min read

आळेफाटा दि.१७:- आळेफाटा (ता. जुन्नर) येतील शुभम तारांगण हरित गृहप्रकल्प प्रसिद्ध असून येथे अनेक नागरिक सदिच्छा भेट देत असतात. प्रकल्पाला असलेली कनेक्टिव्हिटी, जल शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, कंपोस्ट खत प्रकल्प, पी. व्ही. सोलर प्रकल्प, सोलर वॉटर हिटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग हे प्रकल्प पर्यावरण पूरक असून नागरिकांना आकर्षित करत आहेत.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील विविध शाळांमधील शिक्षकांनी या हरित गृहप्रकल्पास सदिच्छा भेट दिली. यावेळी बेल्हे, राजुरी, आळेफाटा, खामुंडी, पिंपरी पेंढार या भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचा समावेश होता.

भेट देऊन शिक्षकांनी प्रकल्पाची माहिती घेतली. या अश्या नावीन्यपूर्ण व सुखसोईंनी समृद्ध अश्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलकडून प्लॅटिनम रेटिंग हा मान मिळविलेल्या गृहप्रकल्पास शुभेच्छा देत शिक्षकांनी आभार प्रदर्शित केले.तसेच सॅम्पल फ्लॅटसची पाहणी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे