आण्यात शहीद जवानाच्या वीर पत्नीच्या हस्ते ध्वजारोहन

1 min read

आणे दि.१६:- श्री क्षेत्र आणे येथे ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सरपंच प्रियंका दाते, उपसरपंच सुहास आहेर व सर्व सदस्य, अनेक संस्थांचे पदाधिकारी,अनेक माजी सैनिक आदी उपस्थित होते.प्रथम नागरिक म्हणून सरपंच यांनी ध्वजारोहण करण्याची विनंती उपस्थितांनी केली. परंतु ध्वजारोहण करण्यासाठी गावच्या सरपंच प्रियंका दाते यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत उपस्थित वीर पत्नीला ध्वजारोहण करण्याची विनंती केली. या प्रसंगी सरपंच प्रियंका दाते यांनी शहीद वीर जवान जयराम लक्ष्मण दाते यांच्या पत्नी मिनाक्षी जयराम दाते यांचे हस्ते ध्वजारोहन करून एक वेगळा आदर्श घालून दिला. या प्रसंगी ग्रामपंचायत आणे व श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान संस्था आणे यांच्या वतीने सर्व माजी सैनिक, पीएसआय पदी निवड झालेल्या आरती सासवडे व आणे गावातील सर्व गुणवंत, प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कार्याबद्दल पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भगत, वैद्यकिय अधिकारी डॉ. असीम आतार यांचा सन्मान करण्यात आला . यावेळी सरपंच प्रियंका दाते यांनी मनोगत व शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब आहेर यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे