आळ्यात स्वयंभू अकरा फुटी उंचीच्या वारुळाभोवती नागवेढ्या पाच फणी नागदेवतेच्या मूर्तीची महिलांनी केली सामूहिक महापूजा

1 min read

आळे दि.२२:- आळे (ता.जुन्नर) येथे स्वयंभू अकरा फुटी उंचीच्या वारुळाभोवती नागवेढ्याची पाच फणी विलोभनीय मूर्ती असून आळे गाव व पंचक्रोशीतील सर्व महिला भगिनी नागपंचमीच्या दिवशी आवर्जून वारूळ व नागदेवतेचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित असतात. या बाबत सविस्तर माहिती अशी की, श्री महावेताळेश्वर छत्र सेवा दरबार आळे (आनंदवाडी) यांचे मार्फत सालाबाद प्रमाणे याही वर्षी नागपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्त महिलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच नागपंचमीला ग्रामीण भागात लुप्त पावत चालेली झोक्याची परंपरा येथे सुरू आहे. झोके खेळण्यासाठी मुली व महिलांनी मोठी गर्दी केली होती. दूध तसेच नैवद्य ठेऊन वारुळाची व नागदेवतेची महिलांनी एकत्र महापूजा केली. या मूर्तीचे वैशिष्ट म्हणजे ही स्वयंभू अकरा फुटी उंचीच्या वारुळाभोवती नागवेढ्याची पाच फणी विलोभनीय मूर्ती आहे. या ठिकाणी नाग व वारूळ यांचा दुहेरी संगम असून येथे दर्शन घेण्यासाठी हजारो महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात येत असतात. या उत्सवाची सांगता संध्याकाळी नागदेवतेच्या महाआरतीने झाली. या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, नेताजी डोके, संजय कुऱ्हाडे, (विश्वस्त, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट), चंद्रकांत पाटील भुजबळ, कृ.उ.बा.स.सदस्य), संजय पाटील भुजबळ यांची उपस्थिती लाभली. तसेच यावेळी श्री महावेतळेश्वर छत्र सेवा दरबारचे सर्व कार्यकर्ते सभासद उपस्थित होते. तसेच दरवर्षी हा नागपंचमी महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री महावेळेश्वर छत्रसेवा दरबाराचे सर्व कार्यकर्ते अथक परिश्रम घेतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे