शिरूर लोकसभा मतदार संघातील प्रकल्पासाठी ३० हजार कोटी मंजूर:- खासदार डॉ. अमोल कोल्हे
1 min readआळेफाटा दि.१८:- खासदार डॉ.अमोल कोल्हे आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते.यावेळी त्यांनी विविध रस्त्यांचे भूमिपूजन केले. शिरूर लोकसभा मतदार संघातील प्रकल्पासाठी ३० हजार कोटी मंजूर झाले असल्याची माहीती डॉ.अमोल कोल्हे यांनी राजुरी (ता.जुन्नर) या ठिकाणी दिली.
शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या माध्यमातुन व आमदार अतुल बेनके यांच्या सहकार्यातून मंजुर झालेल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतुन ४ कोटी ८२ लक्ष रुपयांचा निधी बोरी बुद्रुक ते राजुरी उंचखडक या रस्त्यासाठी मंजुर झाले. या कामाच्या भुमीपुजन प्रसंगी ते खासदार बोलत होते .
यावेळी आमदार बेनके म्हणाले की चिल्हेवाडी बंद पाईप लाईन साठी शंभर कोटींची निधी मंजुर झाला असुन राहीलेले काम लवकरात लवकर पुर्ण केले जाईल. तसेच आणे पठार भागावरील चार गावे व राजुरी व उंचखडक या गावांसाठी चारा डेपो चालु करण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला असुन तोपर्यंत लोकसहभागातुन जणावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन यावेळी दिले.
याप्रसंगी जिल्हा परीषदेचे माजी सदस्य शरद लेंडे,पांडुरंग पवार, माजी सभापती दिपक औटी, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सुरज वाजगे, राजुरी गावच्या सरपंच प्रिया हाडवळे,उंचखडक गावच्या सरपंच सुवर्णा कणसे, उपसरपंच माऊली शेळके, ॲड.विजय कु-हाडे, मोणिका वाळुंज, बाळासाहेब औटी , वल्लभ शेळके, शाम माळी, गणपत कवडे, एम.डी.घंगाळे, बाळासाहेब हाडवळे, लक्ष्मण घंगाळे, संजय हाडवळे, प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता एस.एस.कुलकर्णी, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
जुन्नर तालुक्यातील २४ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. यामधे ओतूर-पानसरेवाडी रस्त्याचे भूमीपूजन,ओतूर – डोमेवाडी रस्त्याचे भूमीपूजन, पिंपळवंडी हायवे चौक आळे भटकळवाडी वडगाव कांदळी ते हिवरे तर्फे नारायणगाव रस्त्याचे भूमीपूजन,
बोरी बु. ते राजुरी उंचखडकवाडीचे रस्त्याचे भूमीपूजन,बेल्हे- कोंबरवाडी रस्त्याचे भूमीपूजन, खोडद ते रा.मा. (निमगाव सावा) रस्त्याचे भूमीपूजन, हिवरे तर्फे नारायणगाव हिवरे सातपुडा रस्त्याचे भूमीपूजन, खोडद – नारायणगाव वारुळवाडी ते तालुका हद्द रस्त्याचे भूमीपूजन संपन्न झाले.