आणे घाटात बिबट्याचे ठाण

1 min read

आणे दि.१४:- आणे (ता. जुन्नर) घाटातील गणपती मंदिराजवळ बिबट्या पुलावर ठाण मांडून बसलेला वारंवार दिसत आहे. रात्री ११ ते ४ च्या दरम्यान या ठिकाणी बिबट्या घाटातून प्रवास करताना अनेक नागरिकांना दिसत आहे. रविवार दि.१३ रात्रीचे सुमारास आणे गावातील सचिन दाते व प्रताप भोर हे आळेफाटा येथून आणे या ठिकाणी आपल्या राहत्या घरी जात असताना त्यांनी घाटातील पुलावर बिबट्या बसलेला दिसला. वाहनाच्या आवाजाला न घाबरता बिबट्या येथे बसत असून नागरिकांना घाटातून प्रवास करण कठीण झालं आहे. रात्रीच्या सुमारास जर दुचाकी या घाटातून जात असेल तर चढावरती असताना दुचाकीचा वेग कमी होत असतो अशा वेळी बिबट्या सहज दुचाकी स्वारावर झडप घेऊ शकतो. कोणतीही वाईट दुर्घटना घडण्या आधी वन विभागाने या ठिकाणी तत्काळ पिंजरा लावावा अशी मागणी गावच्या सरपंच प्रियांका दाते यांनी केली आहे. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून राहावं लागत आहे.आळे, आणे,उंचखडक, राजुरी, निमगाव सावा, राजुरी, जाधववाडी, रानमळा,बेल्हे,आणे पठार या परिसरात बिबट्या दिवसा ढवळ्या दर्शन देत असतो. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना शेतामध्ये पाणी देण्यासाठी जाणे अवघड झाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे