स्वातंत्र्य दिनी आमदार विकास निधीतून बांधण्यात आलेल्या वर्ग खोलीचे उद्घाटन

1 min read

लवणवाडी दि.१६:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवणवाडी (ता.जुन्नर) येथे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मा. आमदार विधान परिषद सदस्य, पदवीधर मतदार संघ, पुणे विभाग यांच्या आमदार विकास 10 लक्ष निधीतून बांधण्यात आलेल्या वर्ग खोलीचे उदघाटन जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा सरपंच आळे प्रितम काळे. उपसरपंच विजय कुऱ्हाडे, जुन्नर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक व आळे ग्रामपंचायतीचे सदस्य‌ मा. बाजीराव लाड, ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, उपाध्यक्ष सौरभ भाऊ डोके, संचालक- सम्राट कुऱ्हाडे व संचालक- रमेश कुऱ्हाडे. लवणवाडी विभागाचे आळे ग्रामपंचायत सदस्य मंगेश कुऱ्हाडे, उर्मिला कुऱ्हाडे, लवणवाडीतील दानशूर व्यक्तिमत्व शांताराम कुऱ्हाडे.‌ खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र संभाजी कुऱ्हाडे,‌ आळे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र बबन कुऱ्हाडे, विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष रभाजी ठाकूर बाबा हुलवळे, आळे विविध कार्यकारी सोसायटीचे व्हॉईस चेअरमन अर्जुन पाटील कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे माजी अध्यक्ष गिरीश कोकणे, जि. प. शाळेसाठी भूदान दिलेल्या प्रमिला बबन कुऱ्हाडे. आजच्या ध्वजारोहणाचे मानकरी जनाभाऊ हुलवळे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुळशीराम अण्णा कुऱ्हाडे, संदीप पाटील कुऱ्हाडे, महेश कुऱ्हाडे, सुरेश कुऱ्हाडे सर, शशिकांत कुऱ्हाडे , गणेश हुलवळे , निलेश कुऱ्हाडे, संदीप कुऱ्हाडे,सुनिल हुलवळे,संतोष हुलवळे साई गुंजाळ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गौरव कोकणे व सर्व सदस्य. शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा राणी मटाले, सहशिक्षिका दिपाली बेल्हेकर, लवणवाडी अंगणवाडी सेविका नीलम कुऱ्हाडे व लवणवाडीतील ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. तसेच शाळेसाठी भूदान दिलेल्या कै. बबन देवजी कुऱ्हाडे यांचे कुटुंबीय प्रमिला बबन कुऱ्हाडे व मच्छिंद्र भिकाजी लोंढे कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. अतुल बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 100 वहया देण्यात आल्या . शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अल्पोआहाराची व्यवस्था राजेंद्र संभाजी कुऱ्हाडे यांनी केली. आळे ग्रामपंचायत मार्फत लवणवाडी जि .प शाळेतील मैदानावर संपूर्ण प्लेव्हिग ब्लॉक बसून देण्याचे आळे ग्रामपंचायतचे सरपंच प्रीतम काळे यांनी जाहीर केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे