आमदार अतुल बेनके यांच्या शुभहस्ते मंगरूळ गावात होणार कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन
1 min read
मंगरुळ (ता.जुन्नर) येथे उद्या रविवार (दि.१३) सकाळी ११ वाजता विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. गावात कोट्यावधीची कामे होणार आहेत. यामधे ग्रामसचिवालय बांधकाम- १ कोटी रुपये, कोरडेमळा सभामंडप-१० लक्ष रुपये, जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना-४ कोटी १७ लक्ष रुपये, मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंगरुळ ते झापवाडी रस्ता डांबरीकरण क्रॉक्रेटीकरण-३ कोटी रुपये असा विकास कामांचा समावेश आहे.खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न होणार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सन्माननीय उपस्थितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे रमेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा ज्ञानेश्वर खिल्लारी, प्रांताधिकारी जुन्नर गोविंद शिंदे, कार्यकारी अभियंता शशिकांत कुलकर्णी, जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस, गट विकास अधिकारी श्याम माळी, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब देवडे.
माजी सदस्य जिल्हा परिषद शरद लेंडे, समर्थ संकुल चे विश्वस्त वल्लभ शेळके,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष अतुल भांबेरे, झापवाडी सरपंच सचिन उंडे, पारगाव तर्फे आळे सरपंच रेश्मा बोटकर, कावळ पिंपरीच्या सरपंच ताराबाई पाबळे, विघ्नहर सहकारी साखर कारखाना चेअरमन सत्यशील शेरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले.
कात्रज दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिल्लारी,बेल्हे मुक्ताई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जानकू डावखर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रीतम काळे, निमगाव सावा चे सरपंच किशोर घोडे, साकोरीच्या सरपंच सुरेखा गाडगे, रानमळा सरपंच सविता तिकोने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, माजी पंचायत समिती सदस्य अनघा घोडके, उद्योजक संभाजी चव्हाण, बेल्हे गावचे माजी सरपंच गोट्याभाऊ वाघ,औरंगपुर सरपंच माया कामठे,आणे गावच्या सरपंच प्रियांका दाते, उपस्थित असणार आहेत.
तर हिच निमंत्रण पत्रिका समजून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गावच्या सरपंच तारा लामखडे, उपसरपंच नानाभाऊ नवले,सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी केले आहे.