कल्याण- नगर महामार्गावर ट्रक – दुचाकी अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू; एक गंभीर
1 min read
आळेफाटा दि.१४:- कल्याण – नगर महामार्गावर आळे येथे ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात राजुरी (ता.जुन्नर) येथील शिवसेना शाखा प्रमुख शांताराम विठ्ठल हाडवळे यांचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला असून गावावर शोककळा पसरली आहे.
आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रविवार दि.13 रोजी सायंकाळी 06ः45 वाचे सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र आळे समोर कल्याण- नगर हायवे रोडवरून मोटार सायकल क्र एम एच 12 एन झेड 5206 ही आळेफाटा बाजुकडुन नगर बाजुकडे जात असताना पाठीमागुन येणारा ट्रक एम एच 12 एस.एफ.5477 ची जोराची धडक बसून ते खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला.
तर मागे बसलेल्या जयदिप सामंत (रा राजुरी, ता जुन्नर) यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर आळेफाटा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार चालु आहेत.
पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष दुपारगुडे हे करत आहेत. मच्छिंद्र सबाजी हाडवळे (वय 48 वर्शे धंदा शेती रा डोबीमळा, राजुरी) यांनी आळेफाटा पोलिसांत फिर्याद दिली असून ट्रक (एम एच 12 एस.एफ.5477) ड्रायव्हर यांच्या विरोधात आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.