राजुरीत पाळीव प्राण्यांवर हल्ले करणारा बिबट्या पिंज-यात जेरबंद
1 min read
राजुरी दि.४:- अनेक दिवसांपासुन राजुरी (ता.जुन्नर) परिसरात धुमाकुळ घालणारा बिबट्या शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पिंज-यात जेरबंद झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजुरी (ता.जुन्नर) या परिसरात बिबट्याने अनेक दिवसांपासुन पाळीव प्राण्यांवर हल्ले करुन ठार केले होते. त्यामुळे या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी केली होती.
त्यानुसार या गावातील यमाई तुकाई मळ्यामधील गोविंद शंकर हाडवळे यांच्या शेतावर पिंजरा लावण्यात आला होता व शुक्रवारी (दि.४) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा चार वर्षे वयाचा बिबट्या जेरबंद झाला आहे.
घटना स्थळी वन अधिकारी त्रिंबक जगताप,स्वप्निल हाडवळे यांणी त्यास माणिक डोह येथील बिबट्या निवारण केंद्रात सोडले आहे.