भारत कृषी सेवेकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप

1 min read

आळेफाटा दि.१८:-भारत कृषी सेवा या ॲग्रीटेक क्षेत्रातील नामवंत कंपनीकडून मुक्तादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नारोडी (ता.आंबेगाव) या प्रशालेत शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांचा खर्च कमी व्हावा त्यांना शिक्षण मिळावं, कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये याकरीता मोफत शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले.


यावेळी बोलत असताना भारत कृषी सेवेच्या सर्वेसर्वा, संस्थापिका तथा सीईओ शरयू लांडे यांनी सांगितले की भारत कृषी सेवा शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच सातत्याने ठामपणे उभी आहेच, परंतु त्यांच्या पाल्यांच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी देखील ठामपणे उभी राहील असे सांगितले.

पुढे बोलत असताना त्या म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी शिकत असताना संस्काराबरोबर आधुनिक तंत्रज्ञान देखील स्वीकारल पाहिजे, आजचे विद्यार्थी उज्ज्वल भारताचे भविष्य आहे.याप्रसंगी भारत कृषी सेवेचे संस्थापक तथा सिओओ हेमंत ढोले पाटील यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.

पुढे बोलत असताना ढोले पाटील म्हणाले की हे सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःला सक्षम बनवणे खूप महत्त्वाचे आहे.भारत कृषी सेवेचे असिस्टंट व्हॉइस प्रेसिडेंट विरभद्र गोगे यांनी कंपनीचे शेतीमधील प्रगतशील कार्य व येणाऱ्या काळातील विद्यार्थ्यांसाठी असणारे विविध योजना यांची सखोल माहिती यावेळी दिली.


याप्रसंगी वह्या स्वीकारत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच विलक्षण आनंद आणि हास्य होते.या गौरवशाली कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती भारत कृषी सेवेचे संचालक सुशीला लांडे व शांताराम लांडे तसेच नारोडी गावचे माजी सरपंच आणि सोसायटीचे सदस्य नवनाथ हुले गावातील ग्रामस्थ, विद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल काठे आणि सर्वच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत कृषी सेवेचे अधिकारी धीरज ढेकाणे, शुभम कसबे आणि हर्षदा भवारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे