नारायणगाव कृषि विज्ञान केंद्रा अंतर्गत नळवणेतील महिलांना प्रशिक्षण
1 min read
नवळणे दि.२०:- कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव यांच्या वतीने नुकतेच नळवणे (ता.जुन्नर) या ठिकाणी लोणचे, चटणी, सरबत यांचे एक दिवशीय प्रशिक्षण चे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी कृषि विज्ञान केंद्राचे गृह विज्ञान शाखेचे निवेदिता डावखर यांनी महिलांना आंबा लोणचे, करवंद लोणचे, चटणी, लिंबू लोणचे, कैरीचे पन्हे असे पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले.
या वेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता.या प्रशिक्षनाचे आयोजन श्री तुकाई देवी महिला बचत गटाच्या सचिव दीपाली देशमुख यांनी केले होते. या प्रसंगी दीपिका शिंदे, सोनाली देशमुख, धनश्री गुंड, उषा देशमुख व इतर महिला उपस्थित होत्या.
नळवने पठारावरती उन्हाळया मध्ये शेती साठी पाणी नसल्यामुळे या शेतकरी महिलांना इतर गावा मध्ये रोजगारा साठी जावे लागते, तसेच नळवणे पठारा वर करवंदाची झाडे मोठ्या प्रमाणात असल्याने करवंद मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतात, यासाठी या करवंदा चे लोणचे, चटणी बनवल्यास महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
तसेच करवंदा च्या चटणी व लोणचे साठी शहरी भागातून खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या शेतकरी महिलांनी एप्रिल, मे महिन्या मध्ये लोणचे, चटणी बनवल्यास महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो असे मत कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव येथील महिला व गृह विज्ञान विभागा च्या निवेदिता डावखर शेटे यांनी सांगितले.