पुण्यात विषारी दारूमुळे १३ जणांचा मृत्यू?; दोषींवर कठोर कारवाई करणार:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1 min read
पुणे दि.२९:- पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे सुरू झालेले मृत्यूचे तांडव थांबत नसून सारे शहरच हादरून गेले आहे. एकामागून एक सुरू असलेल्या मृत्यूसत्रामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आनंदवन, काटेवस्ती, संजयनगर, आझाद चौक आणि जय महाराष्ट्र चौक या परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण आहे. तर विषारी दारूमुळे एकाच घरातील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, विषारी दारुमुळे पिंपरी चिंचवडच्या फुगेवागीतील विजय राठोड आणि विजु राठोड या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय
तर त्यांचे वडील प्रकाश यांची देखील दृष्टी नाहीशी झाली आहे. त्यांनाही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.विजय आणि राजू राठोड हे दोघांचीही मुलं लहान आहेत. त्यांच कुटुंब या दारुकांडामुळे अक्षरश: उघड्यावर आलं आहे.दोघांच्या पत्नी सारिका आणि संगीता या दोघींनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की,
“घरातील कर्ते पुरुष गेले, आता मुलांना कसं वाढवायचं?” असा आक्रोश पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीतील राठोड कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. विषारी दारूमुळे विजय राठोड आणि विजू राठोड या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला, तर त्यांचे वडील प्रकाश राठोड यांचीही दृष्टी गेली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विजय आणि विजू या दोघांचीही मुलं अजून लहान आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर मोठं संकट कोसळलं असून कुटुंब अक्षरशः उघड्यावर आलं. पती गमावल्याचं दुःख आणि पुढील आयुष्याची चिंता व्यक्त करताना पत्नी सारिका आणि संगीता राठोड यांना अश्रू अनावर झाले.
“आता मुलांचं शिक्षण, घरखर्च कसा चालवायचा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करावी आणि कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. या संपूर्ण घटनेनंतर फुगेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
एका कुटुंबाच्या हसत्या खेळत्या संसाराची एका दिवसातच राखरांगोळी झाली. घराचा मुख्य आधार असलेली दोन कमावती मुले एकाच दिवशी सोडून गेली. फुगेवाडी परिसरातील राठोड कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा एकाच दिवशी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत.
विजय आणि राजेंद्र राठोड यांच्या पत्नी सोनाली राठोड आणि संगीता राठोड यांनी हंबरडा फोडला होता. सोनाली यांना एक मुलगा आणि मुलगी, तर संगीता यांना दोन मुले. दोघा भावांनी कष्टानं संसाराचा गाडा चालवला होता. या दोन्ही भावांनाही प्रत्येकी दोन-दोन लहान मुले आहेत.
चिमुरड्यांचे भविष्य चांगलं व्हावं, म्हणून हे दोन्ही भाऊ मुंबई सोडून फुगेवाडी परिसरात कामाला आले होते. त्यातच हा घात झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात माझं पुणे पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी विषारी दारू तयार झाली हे पोलिसांनी शोधून काढलेले आहे.
याच्या पाठीमागे जे काही लोक आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणखी काही लोक यात असू शकतात.ते शोधण्याचे काम सध्या सुरू आहे. ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना उपचार करून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे. ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालं
त्याच्या पाठीमागे कोण-कोण आहेत हे पोलीस शोधून काढत आहेत. आतापर्यंत आठ लोकांना अटक झाली आहे. अजून काही लोकांना अटक होऊ शकते. या प्रकरणातील संपूर्ण साखळी शोधून त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण ही एक प्रकारे हत्याच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
