पुण्याच्या शेतकऱ्याकडून साईचरणी 3,507 किलो केशर आंब्याचे दान
1 min read
शिरूर दि.२८:- पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील नारायणवाडी येथील प्रगतशील शेतकरी रवी नारायण कराळे यांनी श्रद्धेपोटी श्री साईबाबांच्या चरणी तब्बल ३ हजार ५०७ किलो सेंद्रिय केशर आंब्याचे दान अर्पण केले आहे.
शिर्डीतील साईप्रसादालयात गुरुवारपासून पुढील तीन दिवस या आंब्यापासून तयार करण्यात आलेला आमरस भाविकांना प्रसाद म्हणून दिला जाणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून कराळे हे नियमितपणे साई संस्थानला केशर आंब्याचे दान करत आहेत.
स्वतःच्या शेतात कोणतेही रासायनिक खत किंवा फवारणी न वापरता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले हे आंबे आरोग्यदायी व सुगंधी असल्याचे सांगितले जात आहे. साई संस्थानच्या माहितीनुसार, या तीन दिवसांत अंदाजे दीड लाख भाविक आमरस प्रसादाचा आस्वाद घेणार आहेत.
