पारगावच्या विकास चव्हाण यांची कृषी विभाग आत्मा सदस्य पदी नेमणूक

1 min read

बेल्हे दि.२८:- प्रगतशील युवा शेतकरी आणि विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक विकास हरिभाऊ चव्हाण स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) यांची जुन्नर तालुका कृषी विभागाच्या आत्मा (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) या शेतकरी सल्लागार समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड जाहीर करण्यात आलेली आहे.आत्मा नियामक मंडळ पुणेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविणे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शासकीय विविध योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!