श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट माळवाडी (बोटा) च्या विद्यार्थ्यांची Genom Biotech, सिन्नर येथे कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड
1 min read
माळवाडी (बोटा) दि.२८:- श्री बाळेश्वर शैक्षणिक व कृषी विकास फाउंडेशन संचलित श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, माळवाडी (बोटा) (ता.संगमनेर) येथील विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखली आहे.
Genom Biotech, सिन्नर येथे आयोजित कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेमध्ये संस्थेचे विद्यार्थी रोहित टारगे, ओमराज कोल्हे, सुदर्शन वाडिडके व साहिल सय्यद यांची Warehouse Department मध्ये निवड झाली आहे.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी पोखरकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की,
“विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण मेहनत, कौशल्य विकास आणि शिस्त यांच्या जोरावर हे यश संपादन केले असून भविष्यातही संस्थेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात यश मिळवतील.”तसेच संस्थेचे सचिव डॉ. अमित पोखरकर यांनी शुभेच्छा देताना म्हटले की, “अंतिम वर्षाच्या परीक्षा
पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड होणे ही संस्थेसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता, कौशल्य व संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर आतापर्यंत २२ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली असून संस्थेचा प्लेसमेंट आलेख सातत्याने उंचावत आहे.”
विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये प्रशिक्षण व प्लेसमेंट विभाग प्रमुख सचिन वाकचौरे यांचे विशेष मार्गदर्शन व परिश्रम लाभले असून त्यांच्या कार्याचे संस्थेच्या व्यवस्थापनाकडून कौतुक करण्यात आले.कॅम्पस प्लेसमेंटसाठी आवश्यक असणारे संवाद कौशल्य, मुलाखत तंत्र, व्यक्तिमत्व विकास
तसेच उद्योगाभिमुख प्रशिक्षण संस्था स्तरावर नियमितपणे दिले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील
असल्याचे यावेळी सांगण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
