शरदचंद्र पतसंस्थेची कल्याण मध्ये नवीन शाखा; रविवारी उद्घाटन

1 min read

राजुरी दि.२९:- संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या राजुरी (ता.जुन्नर) येथील शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्थेची सोळावी शाखा येत्या रविवार दिनांक ३१ मे रोजी कल्याण येथे सुरु होत आहे. पतसंस्थेचे अशी माहिती अध्यक्ष एम.डी. घंगाळे यांनी दिली.संस्थेच्या कल्याण शाखेचे उद्घाटन रविवारी दुपारी १२.१५ वा संविधान समता दिंडीचे संचालक समाज प्रबोधनकार ह.भ. प. डॉ. शाम सुंदर महाराज सोन्नर व भागवताचार्य ह.भ.प संदिप महाराज डुंबरे यांच्या हस्ते होणार असून यानिमित्ताने शाखा कार्यालयात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले आहे.संस्थेच्या या शाखा उद्घाटन कार्यक्रमासाठी सर्व सभासदांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष एम.डी.घंगाळे उपाध्यक्ष राजेंद्र औटी, सचिव दत्तात्रय गंधट, खजिनदार भिमाजी मालुस्कर व संचालक मंडळाने केले आहे. पतसंस्थेच्या प्रगती विषयी अधिक माहिती देताना अध्यक्ष घंगाळे यांनी सांगितले की, पतसंस्थेची चारशे कोटी रुपयांच्या ठेवीकडे वाटचाल सुरु असून पतसंस्थेचे अठरा हजार पाचशे सभासद आहेत. भागभांडवल अठरा कोटी रुपये असून ठेवी तीनशे पंधरा कोटी रुपयांच्या आहेत संस्थेने सभासदांना दोनशे पन्नास कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असून गुंतवणूक १७ कोटी, सर्व निधी पंचवीस कोटी असा एकत्रित ५६५ कोटी रुपयांचा व्यवसाय आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!