नाशिकमध्ये नीट परीक्षेचा पेपर लीक, ३ मे रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द 

1 min read

नाशिक दि.१२:-नाशिकमध्ये नीट परीक्षेचा पेपर लीक झाला असल्याने 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नाशिक ते हरियाणा पेपरफुटीचे प्रकरण समोर आले आहे. पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून फुटली आहे.पेपर लीक प्रकरणात महत्त्वाची माहिती मिळाली आहे. प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर पहिली कॉपी नाशिकमध्ये समोर आली आहे. देशभरातील 22 लाख विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे भविष्य ठरवणारी नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे.एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल. आता, या पेपरफुटीचे प्रकरण समोर आले आहे. नाशिकमधून नीट परीक्षेचा पहिला पेपर फुटला आहे. तर येथून पहिली प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. पेपर लीक प्रकरणात नाशिकमधील ही लीक प्रश्नपत्रिका हरियाणात पोहोचली आहे. येथे फुटलेल्या पेपरचे 10 सेट तयार करण्यात आले आहेत.त्यानंतर, हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीरपर्यंत नीटची प्रश्नपत्रिका सहजपणे पोहोचल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.त्यामुळे,नीट परीक्षेसाठी काम करणाऱ्या संस्था आणि एजन्सीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नीट पेपर फुटीच्या प्रकरणाचा तपास आता देशातील सर्वात सक्षम तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयकडे देण्यात आला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. जयपूरमधून अटक करण्यात आलेला मनीष हाच पेपरफुटीचा मास्टरमाईंड असल्याचे दिसून येते.मनिषने प्रश्नपत्रिका प्रिंट होण्यापूर्वीच पेपरमधी संभावित प्रश्न माहिती करुन घेतले होते. पेपरीफुटीमुळे नीटची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. सीबीआयमार्फत याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. देशभरात गेल्याच आठवड्यात म्हणजेच 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा घेण्यात आली होती. आता, नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल,त्यासाठी परीक्षार्थींचे परीक्षा केंद्र 3 मे रोजीचेच राहणार आहे. विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांकडून नव्या परीक्षेसाठी शुल्क घेतले जाणार नाही, मात्र नव्या परीक्षेसाठी नवे ओळखपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थी,पालकांनी फक्त एनटीएच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केंद्राकडून करण्यात आले आहे. देशभरात 3 मे 2026 रोजी झालेली नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठी चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, परीक्षा रद्द झाल्याच्या निर्णयानंतर आता पुढे काय होणार, पुन्हा परीक्षा कधी होणार, याबाबत विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये तणाव आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!