वाढदिवसाचा खर्च टाळून टँकरने मोफत पाणी पुरवठा; पंकज कणसे प्रतिष्ठानचा दरवर्षी उपक्रम
1 min read
आणे दि.१२ :- राजुरी उंचखडक (ता.जुन्नर) येथील पंकजभाऊ सोपान कणसे यूवा प्रतिष्ठानकडून आणे पठारावरील दुष्काळग्रस्त पाच गावांना मोफत पाण्याची सोय गेल्या महिन्यांपासून सुरू आहे. जोपर्यंत मोठा पाऊस पडत नाही तोपर्यंत या गावांना असाच मोफत पाणीपुरवठा करणार असल्याचे पंकज कणसे यांनी सांगितले.
या गावांना टँकरने मोफत पाणी पुरवठा करण्याचे तिसरे वर्ष असून यंदा आणे पठारावर पाण्याचे संकट तीव्र आहे. या पाण्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. आणे, नळवणे, व्हरुंडी, शिंदेवाडी, पेमदरा, आनंदवाडी या सर्व गावांना ज्या ठिकाणी पाण्याची गरज आहे त्या ठिकाणी तात्काळ हे टँकर जाते.
प्रतिष्ठान ने २५ हजार लिटर क्षमता असलेले हे पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आहे. पंकज कणसे यांना मुबलक पाणी असल्यामुळे त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सदर पाणी हे आणे पठारावरील दुष्काळग्रस्त गावांना देण्याचे ठरवले होते. आणे पठारावर माणसांची व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची ही मोठी समस्या भास आहे.
या प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत या गावांना मोफत पाणीपुरवठा करणारं टँकर एप्रिल महिन्यात आणे येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू केले होते. पावसाळ्यात सुद्धा आपली सामाजिक बांधिलकी जपत पंकज कणसे प्रतिष्ठानचे टँकर सुरू आसल्याने
सामाजिक कार्यकर्ते आनंदा बेलकर, डॉ. दीपक आहेर, किशोर आहेर, पांडू गाडेकर, प्रदीप आहेर तसेच आणे पठारावरील जनतेने पंकज कणसे प्रतिष्ठानचे आभार मानले.
