अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची ६ तास चौकशी, ईडीकडून रुपाली चाकणकर यांना समन्स
1 min read
नाशिक दि.१२:-अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची 6 तास चौकशी करण्यात आली आहे, तर ईडीकडून रुपाली चाकणकर यांना समन्स बजावण्यात आले आहे. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना समन्स बजावला आहे.
ईडीने याच आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात एक मोठी घडामोड समोर आली आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंनी रुपाली चाकणकरांची काल 11 मे 2026रोजी 6 तास चौकशी केली आहे.त्या चौकशीनंतर आता ईडीकडून रुपाली चाकणकर यांना समन्स बजावण्यात आला आहे.भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या
रुपाली चाकणकर यांना ईडीने याच आठवड्यात चौकशी साठी हजर राहण्यास सांगितले आहे. अशोक खरात प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगाने ईडीकडून चौकशी करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. याआधीही ईडीने या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या बहिणीची चौकशी केली होती.
अशोक खरात प्रकरणात ईडीकडून विविध व्यक्तींची चौकशी सुरू असून, आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी केली जात आहे. अशातच एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंनी रुपाली चाकणकरांची 6 तास चौकशी केली आहे, त्यानंतर पुन्हा एकदा रुपाली चाकणकरांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
अशोक खरात प्रकरणात ईडीकडून विविध व्यक्तींची चौकशी सुरू आहे.अशोक खरात प्रकरणात आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात आहे.तर दुसरीकडे शिर्डी फसवणूक प्रकरणी कल्पना खरात यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने तहकूब केली आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल जमीन फसवणूक प्रकरणात
फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारीचे आरोप असलेल्या कल्पना खरात यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज तहकूब केली आहे. राहाता येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कल्पना खरात यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
त्यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात त्यांचे पती अशोक खरात आणि इतर आरोपींनी कर्ज व्यवहाराच्या नावाखाली 10 कोटी रुपये किमतीची शेतकर्यंाची जमीन फसवणुकीने स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप करण्यात आहे.
कल्पना खरात यांच्यावतीने अॅड. प्रशांत गिरी यांनी न्यायालयात बाजू मांडताना हा वाद दिवाणी स्वरूपाचा असून या प्रकरणात आधीच नोटिसा बजावण्यात आल्याचे सांगितले. तसेच कल्पना खरात यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक पथके कार्यरत असून त्यांचे पती अशोक खरात या प्रकरणात आधीपासून तुरुंगात असल्याचेही
त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. अॅड. गिरी यांनी न्यायालयाला असेही सांगितले की, अशोक खरात यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे संपूर्ण कुटुंब लज्जित झाले आहे. अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणी 6 मे रोजी नोटिसा जारी करण्यात आल्या होत्या.
मात्र उच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या ताणामुळे प्रकरणावर गुणदोषांच्या आधारे सुनावणी होऊ शकली नाही.आम्ही तातडीच्या सुनावणीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात,
न्यायालयीन सुट्टीत प्रकरण मांडण्याची मुभा दिली आहे. उच्च न्यायालयाने आता हे प्रकरण न्यायालयाच्या सुट्टीतील तिसर्य आठवड्यात, म्हणजेच २५ मे ते ३० मे 2026 या काळात, उल्लेख करण्यास परवानगी दिली आहे.
