इराणचे सुमारे ३० लाख बॅरल कच्चे तेल प्रत्येक दिवशी समुद्राच्या पाण्यात
1 min read
नवी दिल्ली दि.१२:-अमेरिकेने केलेल्या आर्थिक नाकेबंदीमुळे इराणचे कच्चे तेल जागतिक बाजारपेठेत पोहोचू शकत नाही. परिणामी, साठवणुकीची सर्व यंत्रणा पूर्ण भरल्यामुळे इराणला दररोज सुमारे ३० लाख बॅरल कच्चे तेल समुद्रात वाहून द्यावे लागत आहे. या तेलाची किंमत दिवसाला तब्बल २,८०० कोटी रुपये इतकी आहे.
होर्मुजची नाकेबंदी आणि जहाजांची कोंडी
गेल्या एका महिन्यात इराणचे ५८ ऑईल टँकर होर्मुजची सामुद्रधनी पार करू शकलेले नाहीत. इराणची ३ कोटी बॅरल तेल साठवण्याची क्षमता आता पूर्णपणे संपली आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, २८ एप्रिल रोजी इराणने
आपल्या ‘नाशा’ नावाच्या ३० वर्षे जुन्या जहाजात २० लाख बॅरल तेल साठवले होते. मात्र, आता जहाजांची कमतरता आणि साठवणुकीचे सर्व पर्याय संपल्याने इराणसमोर तेल नष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.
