गुळंचवाडीच्या महिलेने धाडस करून अपघात ग्रस्त तरुणाचा वाचवला जीव
1 min read
बेल्हे दि.२५:- गुळंचवाडी येथे कल्याण- अहिल्यानगर महामार्गावरती अपघात होऊन गंभीर जखमी झालेल्या एका दुचाकी स्वाराचा जीव वाचवण्याचं धाडसी काम एका रणरागिनीने केले असून या तरुणाला स्वतः वेळेत रुग्णालयात पोहोचवले व तरुणाचा जिव वाचवल्याने या महिलेचे जुन्नर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की गुळंचवाडी (ता. जुन्नर) येथे सायंकाळी ७ वाजता आणे घाट उतरून आल्यानंतर स्पीड ब्रेकर जवळ सागर चंदनसे (वय २७, राहणार अजंठा वेरूळ जिल्हा संभाजीनगर) तरुणाला अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने त्याचा अपघात झाला.
या अपघातात त्याच्या पायाला, खांद्याला गंभीर दुखापत झाली व तो बेशुद्ध पडला. या वेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. तरुण मृत झाला असल्याचे समजून कोणीही त्या तरुणाला उपचारासाठी नेले नाही.जवळच राहणार राहणाऱ्या कौशल्या भालचंद्र फापाळे (वय ४५) यांनी अपघाताचा आवाज आल्याने त्या ठिकाणी धाव घेतली.
तत्काळ बेल्हे येथून ॲम्ब्युलन्स बोलावली व आपल्या पतीच्या मदतीने या तरुणाला तत्काळ आळेफाटा येथे एका खाजगी रुग्णालयात घेऊन गेल्या. या तरुणाचे पाय दोन्ही पायाला दोन ते तीन ठिकाणी फॅक्चर असून तरुणाच्या खांद्यालाही गंभीर इजा झाली असल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली व तत्वाला उपचार सुरू केले.
तरुणाला वेळेत रुग्णालयात घेऊन आल्याने फापाळे यांचे डॉक्टरांनी कौतुक केले.फापाळे यांनी धाडसाने या तरुणाला वाचवले. थोडा उशीर झाला असता तर या तरुणाचे जीव केला असता असे डॉक्टरांनी सांगितले. काही वेळानंतर तो तरुण शुद्धी वरती आला.
तरुणाला नाव पत्ता विचारला.तात्काळ त्याच्या नारायणगाव येथील एका मित्राला बोलून घेतले. तसेच या तरुणाचा मोबाईल बॅग व इतर साहित्य सगळं व्यवस्थित जपून ठेवले. सर्व साहित्य मित्राकडे दिले.
————-
प्रतिक्रिया
” माझा स्वतःचा मुलगा समजून मी आईच्या मायेने त्या अपघातग्रस्त तरुणाला मदत केली. अपघात ग्रस्ताला तत्काळ वेळेत मदत मिळाली पाहिजे. त्यामुळे एखाद्याच्या जीव वाचवू शकतो. मनुष्य जन्म पुन्हा नाही येत नाही.
कौशल्या फापाळे, गुळंचवाडी
———-
