आईला बरे करण्याचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार; आळेफाटा पोलिसांनी केले दोन भोंदू बाबा अटक

1 min read

आळेफाटा दि.२५:- वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथे आईचा आजार बरा करण्यासाठी अंगातील ‘दैवीशक्ती’चा वापर करण्याचे खोटे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी दोन नराधम भोंदू बाबांना अटक केली आहे.पंकज देवराम घोलप आणि नाना बर्डे (रा. येडगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडितेच्या आईच्या आजारपणाचा फायदा घेत आरोपींनी अंगारा देऊन बरे करण्याचे आमिष दाखवले. या बहाण्याने पंकज घोलप याने पीडितेशी जवळीक साधून लग्नाचे आमिष दाखवले आणि जानेवारी ते डिसेंबर २०२५ दरम्यान तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या शोषणातून पीडिता गर्भवती राहिली असता, आरोपीने लग्नास नकार देत तिला जीवे मारण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने आळेफाटा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांनी आरोपीं विरुद्ध भारतीय न्याय संहिता, पोक्सो आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!