कौतुकास्पद ! ‘इस्रो च्या चंद्रयान -3’ मोहीमेत जुन्नर तालुक्यातील राजुरीच्या दोन सुपुत्रांचा मोलाचा वाटा

1 min read

राजुरी दि.१४:- भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब म्हणजे आज १४ जुलै रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या वतीने चंद्रयान -3 मोहीम सुरू होणार आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरी कोटा येथील सतीश धवन तळावरुंन LVM प्रक्षेपण यानाच्या मदतीने दुपारी २.३५ मिनिटांनी चंद्रयान -३ आकाशात झेपावणार असून दिनांक २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी हे यानाचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्टलॅडिंग होणार आहे.या मोहिमेतील चंद्रयानाचे प्रक्षेपण होत असताना दुर्दैवाने काही धोका झाल्यास मोठी आग लागण्याची शक्यता असते. त्यातील हानी टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून अग्निशामक यंत्रणा सज्ज ठेवावी लागते. हे सहा कोटी रूपयांचे कॉन्ट्रॅक्ट राजुरीचे (ता.जुन्नर) सुपुत्र उद्योजक असिफभाई महालदार यांच्या रिलायन्स फायर सिस्टीम या कंपनीस मिळालेले असून त्यांनी संबंधित यंत्रणा श्रीहरिकोटा येथे कार्यान्वित केली आहे.राजुरी गावातील प्राचार्य कैलास शेटे यांचे चिरंजीव मयुरेश शेटे हे इस्त्रोत शास्त्रज्ञ असून त्यांचाही या मोहिमेत सक्रिय सहभाग आहे.सिनियर सायंटिस्ट म्हणून शेटे काम पाहतात.मयूर शेटे यांचे शिक्षणविद्या विकास मंदिरचे येथे झाले. देशाच्या या अभिमानास्पद कामगिरीत गावचे हे दोन सुपुत्र सहभागी असल्या बद्दल जुन्नर तालुक्यातील जनतेला अभिमान आहे.सहा पायाच्या रोव्हरच्या मदतीने चंद्रावर १० दिवस थांबून विविध दगड, मातीचे संकलन तसेच चंद्राच्या बाजूच्या वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे.या मोहिमेत डॉ.रितू करिधाल श्रीवास्तव यांचा महत्त्वाचा रोल आहे. या मोहिमेसाठी ६१५ कोटींचा खर्च येणार असून तुलनात्मक दृष्ट्या तो कमी आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया, चीन या देशांनीच फक्त चंद्र मोहीम राबवली असून भारत या या रांगेतील चौथ्या क्रमांकावरील देश आहे.या निमित्ताने भारतीय तंत्रज्ञानाची क्षमता जगाला समजणार आहे.दिनांक २२ जुलै २०१९ रोजी भारताने राबवलेली चंद्रयान 2 ही मोहीम अयशस्वी ठरली होती आपले यान यशस्वीपणे चंद्रावर पोहचले परंतू सॉफ्टलॅडिंग न होता ,ते क्रॅश झाले होते.परंतू अपयशाने खचून न जाता इस्त्रोचे प्रमुख एम. सोमनाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा चंद्रयान -3 मोहीम मोठ्या आत्मविश्वासाने आखली आहे. ती यशस्वी व्हावी यासाठी आपल्या सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे