बिबट्यांच्या झटापटीत एक नर बिबट्या मृत
1 min read
बेल्हे दि.२०:- पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) येथील नेहेरकर मळा या ठिकाणी संदीप सखाराम उदागे यांचे गट नंबर 794 मध्ये बिबट नर दोन बीबट मधील भांडणामध्ये मृत्यू झाला. असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांनी दिली. उदागे हे ऊस लावण्याकरिता शेतामध्ये सरी काढून ठेवली होती.
आज मंगळवार (दि.२०) सकाळी शेतमजूर ऊस लावण्याकरता गेले असता त्यांना उसाच्या सरीमध्ये बिबट्या त्या ठिकाणी दिसला. त्यांनी ताबडतोब वनपाल राजेंद्र गाढवे यांना फोन केला. त्या ठिकाणी पोलीस पाटील हेमंत चव्हाण आपदा मित्र सागर चव्हाण गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
सदरील मृत बीबट नर ला बेल्हे येथे वनविभाग शासकीय निवासस्थान येथे आणून पशुवैद्यकीय अधिकारी बेल्हे यांनी शवविच्छेदन केले.तदनंतर मृत बिबट्याचे अग्निदहन केले.